जिल्हा परिषदेच्या लाचखोर अभियंत्याला रंगेहात अटक

जिल्हा परिषदेच्या लाचखोर अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे. विनोद गंभीरे असं या कनिष्ठ अभियंत्याचं नाव असून नवी मुंबईतील बार अँड रेस्टॉरंटला साऊंड प्रूफ प्रमाणपत्र देण्यासाठी ७० हजार रूपये स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आलं. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील एका रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाकडे साऊंड प्रूफ प्रमाणपत्र देण्याकरिता गंभीरे यांनी ८० हजार रूपयांची मागणी केली होती. पण नंतर ७० हजार रूपये देण्याचं ठरलं. हे पैसे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading