पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणण्यात आल्यामुळे खातेदार-ठेवीदार हैराण

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणण्यात आल्यामुळे खातेदार-ठेवीदार हैराण झाले असून बँकेसमोर ठेवीदारांनी एकच गर्दी केली आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये खातेदारांनी शिरून बँक प्रशासनाला प्रश्न विचारून भंडावून सोडलं. बँकेच्या विविध शाखांमध्ये ठेवीदार, भागधारक, खातेदार यांची गर्दी उसळली होती. ही माहिती मिळताच ब्रह्मांड परिसरातील नगरसेवक मनोहर डुंबरे यांनीही बँकेच्या शाखेत धाव घेऊन बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबत माहिती घेतली. ब्रह्मांड परिसरातील हजारो सेवानिवृत्त व्यापारी, कर्मचारी, गृहिणी आदींच्या कोट्यावधींच्या ठेवी खात्यांमध्ये आहेत. अनेक निवृत्त व्यक्तींचा उदरनिर्वाह ठेवींवरील व्याजावर सुरू आहे. अशा परिस्थिती खातेदारांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांच्याकडे दाद मागण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांना याप्रश्नी साकडं घातलं जाईल असं डुंबरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading