ठाणे महापालिकेच्या प्लास्टीक मुक्ती जनजागृती शिबीराला मोठा प्रतिसाद

प्लास्टीक बंदीच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी तसंच प्लास्टीक वापरामुळे मानवी आरोग्यावर होणा-या विपरित परिणामांबाबत शाळेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित केलेल्या प्लास्टीक मुक्ती जनजागृती शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांना प्लास्टीक निर्मूलनाची शपथ देऊन स्वच्छता हीच सेवा ही मोहिम शालेय स्तरावर व्यापक प्रमाणात राबवण्याचं आवाहन करण्यात आलं. २ ऑक्टोबर २०१४ पासून देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. शहरातील भंगार गोळा करणा-यांना देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात प्लास्टीक कच-याच्या शास्त्रशुध्द विल्हेवाटीकरिता महापालिकेतर्फे शहरात ५ ठिकाणी प्लास्टीक बॉटल क्रशर मशिनरी उभारण्यात आली आहे. या मशिनद्वारे प्लास्टीकच्या बाटल्यांचा चुरा स्त्री मुक्ती संघटना या कचरा वेचक महिलांच्या संस्थेद्वारे संकलन करून त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे पुनर्चक्रीकरण करण्यासाठी जमा करण्यात येणार आहे. तसंच मशिनमध्ये प्लास्टीकच्या बाटल्या टाकणा-या नागरिकांना प्रोत्साहन म्हणून सवलतीचं कूपन मिळणार आहे. शहरातील स्टेशन परिसर, तलावपाळी, आनंद सिनेमा, बी-केबिन, घंटाळी या ठिकाणी प्लास्टीक बॉटल क्रशर मशिन्स उभारण्यात आली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading