घोडबंदरच्या सर्विस रोडच्या रखडलेल्या कामाची खासदार राजन विचारेंकडून पाहणी

ठाणे शहरातील वाढते शहरीकरण आणि घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने हायवे पूर्वद्रूत गती महामार्गाच्या शेजारी सुरू केलेल्या सर्विस रोड मार्गासाठी ४ ठिकाणी असणाऱ्या जागा संजय गांधी उद्यानाच्या हद्दीत येत असल्याने परवानगी न मिळाल्याने ही कामे वर्षभरापासून रखडली होती खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य वनसंरक्षक आणि महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेने पातलीपाडा ते गायमुख या सात किलोमीटरच्या सर्विस रोड च्या कामाला 2001 पासून सुरुवात केली होती आणि 2003 ला हा रस्ता पूर्ण करण्यात आला होता परंतु या सर्विस रोड मधील चार ठिकाणांचा काही भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येत असल्याने याबद्दल संजय गांधी राष्ट्रीय उद्याने महापालिकेकडे याचा खुलासा सादर करावा असे पत्र दिले होते यावर महापालिकेने सल्लागाराची नेमणूक करून परवानगी मिळविण्याचे हे काम सल्लागारकडे दिले परंतु त्यांच्याकडून त्यांना दाद न मिळाल्याने हा आजतागायत या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत पडला होता तसेच सुरू झालेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता तसेच गेल्या तीन वर्षात या मार्गावर 500हुन अधिक अपघात झाले असून 150 अपघाती मृत्यूमुखी पडले आहेत यासाठी खासदार राजन विचारे यांनी याबाबत पुढाकार घेऊन मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली व या पाहणी दौऱ्यात संजय गांधी उद्यानाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हे काम सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली लवकरच महापालिकेला आम्ही परवानगी देऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading