जिल्ह्यात आज कोरोनाचे ५६५ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ५६५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ६२६ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ५ हजार ३४५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख १७ हजार ४६० पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ४१६ रूग्ण उपचार घेत असून ४५ हजार ६९५ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ४७१ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार १३६ रूग्ण उपचार घेत असून ४९ हजार १२३ बरे झाले तर १ हजार २१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार २०१ रूग्ण असून ४३ हजार ६१३ बरे झाले तर ९३१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ६३७ रूग्ण उपचार घेत असून २१ हजार ८३९ कोरोनातून बरे झाले तर ७४४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३८९ रूग्ण असून ९ हजार ६८१ बरे झाले तर ३४७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २२२ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ५०३ कोरोनातून बरे झाले तर ३३८ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १८२ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ७७ बरे झाले तर २७७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १८८ रूग्ण असून ७ हजार २९० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २५५ रूग्ण असून १५ हजार ५२९ बरे झाले तर ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading