भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनोखे रांगोळी प्रदर्शन

भारतीय जनता पक्ष आणि कलाछंद रांगोळीकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखे रांगोळी प्रदर्शन कोपरीतील विद्यासागर विद्यालयात आयोजीत करण्यात आले आहे. या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या हस्ते काल झाले. रंगावलीतुन साकारलेला अप्रतिम व्यक्तिचित्रणाचा अविष्कार पाहण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध झाली असून हे रांगोळी प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य आहे. ठाणे पुर्वेकडील भारतीय जनता पक्षाच्या कृष्णा भुजबळ यांनी आयोजीत केलेल्या या रांगोळी प्रदर्शनाच्या शुभारंभाच्या वेळी रांगोळी रेखाटणाऱ्या कलाछंद मंडळाच्या २० कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कलाकारांचे कौतुक करताना दिवाळीत रांगोळीची परंपरा जपुन संस्कृतीचे जतन केल्याचे निरंजन डावखरे यांनी सागितलं. कोरोनामुळे धास्तावलेल्या नागरिकांच्या मनातील भिती दुर व्हावी,किंबहुना आजच्या पिढीला विविध राजकिय प्रभुतींची ओळख व्हावी,यासाठी छत्रपती शिवराय तसेच ख्यातनाम राजकिय व्यक्तिमत्वांची रेखाचित्र रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या कलाकारांनी केल्याचे कृष्णा भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading