ग्रामीण रस्त्यांना मिळणार कॉंक्रिटचा मुलामा

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कॉंक्रिट रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणखी आठ गावांचे जोड रस्ते कॉंक्रिटचे केले जाणार आहेत. उसरघर, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या गावांना जोडणाऱ्या चार रस्त्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा जाहीर केली आहे. यात उसरघर– निळजे – घेसर या रस्त्याच्या कामासाठी १०७.१४ कोटींची, निळजे – कोळे – हेदूटणे आणि उसरघर – घारीवली या दोन रस्त्यांसाठी १२३.४९कोटी तर हेदूटणे – माणगाव – भोपर या रस्त्यासाठी ९५.९९ कोटी रूपयांची निविदा एमएमआरडीएच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी ३६० कोटी, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी १०० कोटी तर इतर रस्त्यांसाठी २०० हुनअधिक कोटींच्या निधीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सुमारे १ हजार कोटींचा निधी मिळवण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांना यश आले आहे. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विकसीत केल्यास त्याचा गावांना फायदा होऊन गावाचा विकास होईल. याहेतून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठीमोठा निधी उपलब्ध केला जातो आहे. या सोबतच कल्याण शहराच्या वेशीवर असलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचीआवश्यकता होती. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएच्या वतीने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीही मंजूर झाला होता. एमएमआरडीएच्या वतीने नुकतीच या रस्त्यांसाठी निविदाजाहीर केली आहे. यात उसरघर, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या आठ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा यात समावेश आहे. एकूण ३२६ कोटी रूपयांची ही कामे आहेत. या ३२६ कोटींच्या निधीमुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १ हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळवण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांना यश आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading