राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 27 लाखांचा ऐवज जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 27 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला खात्रीलायक माहिती मिळाली होती, त्यानुसार शहापूर मधील एका पत्राच्या गोदामावर छापा मारून काल ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत भारतीय बनावटीच विदेशी मध्य आणि बनावट मध्याचा साठा हस्तगत करण्यात आला. या छाप्यात गोवा बनावटीच्या मॅकडोनाल्ड कंपनीच्या सुमारे सहा लाख 91 हजारांचे 90 बॉक्सेस याच कंपनीचे सहा लाखांचे 79 बॉक्सेस, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की च्या 86 हजार रुपयांचे बारा बॉक्सेस, रॉयल व्हिस्की च्या एक लाख 64 हजारांचे 19 बॉक्सेस, महेंद्र जीत, स्विफ्ट कार तसेच इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading