गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कराची २५ टक्के अधिक वसुली

ठाणे महापालिकेनं गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. यंदा मालमत्ता कराचं उद्दिष्ट ६०० कोटी रूपये ठेवण्यात आलं होतं. पण ५४० कोटी रूपये मालमत्ता करापोटी वसूल करण्यात आले. यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी ३३३ कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी याच काळात २६० कोटी रूपये वसूल करण्यात आले होते. यंदा निवडणुका असल्यामुळे अनेक अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानाही मालमत्ता कराची मोठी वसुली करण्यात यश आलं आहे. मालमत्ता कर विभागानं मोठ्या थकबाकीदारांकडे लक्ष दिलं होतं. १ लाखाहून अधिक मालमत्ता कर थकबाकीदार असणा-यांची सूची तयार करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून ही थकबाकी वसुली करण्यावर भर देण्यात आला होता. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्तीचा इशाराही देण्यात आला होता. त्याचा चांगला फायदा झाला असून मालमत्ता कराची वसुली गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यानं वाढल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading