आज जागतिक मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये सांगलीत पहिल्यांदा विष्णूदास भावे यांनी लिहिलेल्या सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. आता हाच दिवस जागतिक मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. नाटकांची परंपरा आजही थोड्या बहुत फरकानं जोपासली जात आहे. नाटकांचा रोजचा खर्च असल्यानं साहजिकच दौरे परवडणारे नसतात. तरूण पिढीला कमी वेळात मालिका-सिनेमांमधून प्रसिध्दी मिळत असल्यानं त्यांचं नाटकांकडे दुर्लक्ष होतं. पण तरीही अनेक कलाकार रंगभूमीलाच आदर्श मानतात. दरवर्षी रंगायतनमध्ये नाट्यकर्मी रंगभूमी दिन साजरा करतात.