शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी राज्यमंत्र्यांचे आदेश

जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले आहेत. भिवंडी तालुक्यातील महापोली, पालखणे, सूर्यानगर, विश्वगड, झिडके येथे पाहणी केली. अतिवृष्टी झालेल्या शेती शिवारांना खोत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. तसंच पीक नुकसानीचे पंचनामे तयार करून तात्काळ अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी दिले. नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई निश्चितपणे दिली जाणार असून नुकसान भरपाई तातडीनं मिळावी यासाठी योजना तयार करण्यात आल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading