गुडविन ज्वेलर्सच्या मालकाविरोधात लुकआऊट नोटीस

बहुचर्चित गुडविन ज्वेलर्सच्या घोटाळ्यानंतर गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. गुडविन ज्वेलर्सनं मोठ्या व्याजाचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांना भुलवलं आणि कोट्यावधींची फसवणूक केली. गेले काही दिवस ठाणे, डोंबिवली, अंबरनाथमधील गुडविन ज्वेलर्सचे ग्राहक हैराण झाले आहेत. गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाला टाळं लागल्यामुळे काही ग्राहकांनी विविध पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं गुडविन ज्वेलर्समधील घोटाळ्याचा तपास हाती घेतला असून चौकशी सुरू केली आहे. अंबरनाथमध्ये सव्वा दोन कोटी तर ठाण्यामध्ये १ कोटी ६३ लाख रूपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. दुकानाच्या मालकाविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading