ठाण्यातील एका कार्यालयात आढळला दुर्मिळ जातीचा सर्प

दुर्मिळ जातीचा सर्प ठाण्यातील एका कार्यालयातून काल मुक्त करण्यात आला. हा दुर्मिळ जातीचा सर्प विशेषत: पश्चिम घाटामध्ये आढळतो. हा साप बिनविषारी होता. अमेय मालेगावकर या सर्पमित्रानं या सापाला पकडून नंतर त्याची मुक्तता केली. चेंदणी येथील एका खाजगी कार्यालयात हा साप आढळला. हा साप पश्चिम घाटात विशेषत: कर्नाटकमध्ये आढळतो. या कार्यालयाच्या जवळ फुल मार्केट असून बहुधा हा साप दक्षिण भारतातून फुलांच्या खोक्यामधून आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा साप इथला नसून यापूर्वी तो कधीही आढळला नव्हता असं सर्पमित्राकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading