वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित असलेल्या घोरपडीला मारणा-यास अटक

घोरपड या वन्यप्राण्याची शिकार करणा-या व्यक्तीस वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे आणि त्यांच्या पथकानं अटक केली आहे. वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांना मोबाईलवर एक व्हीडीओ आला. या व्हीडीओमध्ये एक व्यक्ती घोरपड या वन्यप्राण्यास चाकूच्या सहाय्यानं कापत होता. याबाबत चौकशी केली असता हा व्हीडीओ बेलापूर-नवी मुंबईतील दुर्गामातानगर सेक्टर ८ मधला होता. याप्रकरणी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता सुभाष राठोड या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आलं. पुनर्वसु फौंडेशनच्या सदस्यांनी मृत घोरपड आणि राठोडला दाखवलं. राठोडची चौकशी केली असता त्यानं ही घोरपड त्याच्या घराजवळ दिसली म्हणून त्याने आणि त्याच्या काही सहका-यांनी तिला दगडाने मारले आणि घोरपडीचं मटण खाण्यासाठी तिला कापत असल्याची कबुली त्याने दिली. राठोड बरोबरील दोन साथीदार फरार आहेत. घोरपड हा वन्यप्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत असून राठोडवर या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. वन्यजीव विषयक कोणतीही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading