खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील २९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील २९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. यामध्ये मुंब्रा, कळवा, खारीगाव या भागातील रस्ते काँक्रीटीकरण, जलवाहिनी टाकणे, शौचालयांची उभारणी, विसर्जन घाट, अभ्यासिका या विकासकामांचा भूमिपुजन करण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार विशेष निधीतून ही विकासकामे मार्गी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुंब्रा कळवा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे कळवा येथील उड्डाणपुलाचे मास्टिक पद्धतीने डांबरीकरण, खारीगाव परिसरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पारसिक नगर येथील दशक्रिया विधी जेट्टी दुरुस्ती, खुला रंगमंच उभारणे आणि जलवाहिनी टाकणे अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मुंब्रा येथील गणेश विसर्जन घाटाचे लोकार्पनही करण्यात आले. तर मुंब्रा शहरातील विविध रस्त्यांचे आणि इतर विकासकामांचेही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading