ठाण्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अच्युत वैद्य यांच अल्पशा आजाराानं निधन झालं ते ९५ वर्षांचे होते. त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्रात काम केलं. ठाण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीमध्ये तसेच ठाणे जनता सहकारी बँकेच्या स्थापनेमध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. संघाच्या संघटनात्मक दृष्टीने अनेक दायित्वे अच्युतरावांनी समर्थपणे पार पाडली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, स्नुषा,मुलगी, जावई, नात नातू, तसेच पणती असा परिवार आहे.