नवीन दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेर पर्यंत सुरु होणार

नवीन दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेर पर्यंत सुरु होणार आहे. काल खासदार राजन विचारे यांनी या स्थानकाची पाहणी केली. ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा क्षेत्राला जोडणारा ऐरोली – कळवा एलिवेटेड या ४२८ कोटींच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला खासदार राजन विचारे यांनी मंजुरी मिळवली होती. या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा एलिवेटेड रेल्वे स्थानक आणि मार्गीकेसाठी १०८० झोपड्यांचे पुनर्वसन करावे लागणार होते. निधी परत जाऊ नये म्हणुन हे काम दोन टप्प्यात करण्यात आले. दोन वर्षानंतर प्रत्यक्ष जागेवर ७ मे २०१८ मध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे काम सुरू झाले. नवी मुंबई शहरात नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक येत असतात या रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात येऊन हार्बर मार्गावरील वाशी लोकल पकडावी लागते त्यामुळे या प्रवाशांचा वेळ ताकद खर्ची पडत असते या प्रवाशांना डायरेक्ट नवी मुंबईमध्ये प्रवेश मिळण्यासाठी हा ऐरोली कळवा एलिव्हेटेड प्रकल्प महत्त्वाच ठरणार आहे. तसेच यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार ही कमी होणार आहे. या पाहणी दौऱ्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असल्यामुळे हे रेल्वे स्थानक महिना अखेर पर्यंत सुरु होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading