खासदार राजन विचारे यांची लोकसभेतील उपस्थिती आणि लोकसभेतील प्रश्न याबाबत समाधानकारक कामगिरी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या कारभाराबाबत टीका होत असली तरी त्यांची लोकसभेतील उपस्थिती आणि लोकसभेत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न याबाबत त्यांची कामगिरी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली असल्याचं दिसत आहे. खासदार डॉट इन्फो या संकेतस्थळानं देशातील ५७१ खासदारांच्या कामगिरीचा अहवाल दिला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. खासदार राजन विचारे यांची लोकसभेतील उपस्थिती ही ७८ टक्के आहे. तर राष्ट्रीय पातळीवर ही सरासरी ६९ टक्के आहे. लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याची राष्ट्रीय पातळीवरील संख्या २५० आहे तर विचारे यांनी लोकसभेत ५११ प्रश्न विचारले होते. लोकसभेतील चर्चेमध्ये सहभागाची राष्ट्रीय पातळीवरील सरासरी ही ६५ आहे तर विचारे हे ५३ चर्चेमध्ये सहभागी झाले होते. विचारे यांनी कोणतंही खाजगी बील लोकसभेत मांडलं नाही. प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघासाठी खासदार निधी दिला जातो. राष्ट्रीय पातळीवरील खासदार निधीची सरासरी १८ कोटी आहे तर विचारे यांनी १७ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी आपल्या मतदारसंघात खर्च केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading