खासदार राजन विचारे यांचा लोकसभेत ठाणे रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचा नियम ३७७ च्या माध्यमातून दाखल

खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या धोकादायक म्हणुन पाडलेल्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारतीच्या पुनर्विकासासाठी रेल्वे मंत्रालयाकडून जास्तीत जास्त निधीची तरतूद करून या इमारतीचे बांधकाम सुरू करावे यासाठी पुन्हा लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत या लोकसभा आयुधाच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकात दररोज ८ लाख प्रवासी ये-जा करीत असतात. परंतु ऐन गर्दीच्या वेळी या रेल्वे स्थानकात एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी गर्दीतून बाहेर पडण्यासाठी कसरत प्रवाश्यांना करावी लागत आहे. त्याचा प्रवासांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात अपुऱ्या अवस्थेत असलेल्या पादचारी पुलाचे काम लवकर मार्गी लावावे. त्याचबरोबर धोकादायक म्हणून पाडण्यात आलेल्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारतीचे काम करण्यासाठी (RLDA) रेल्वे लाईन डेव्हलपमेंट द्वारा बनविण्यात आलेल्या आराखड्यास मंजुरी देऊन या कामासाठी निधीची तरतूद करून याचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी सभागृहात मांडण्यात आली. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात पडणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक व ऐरोली कळवा एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्प यांना गती देण्यासाठी संबंधित विभागाला आदेश पारित करा असे म्हटले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading