ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहास आजपासून सुरूवात

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहास आजपासून सुरूवात झाली. जिल्ह्यातील या कालावधीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यासाठी विकसित केलेल्या वेबपोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी दिल्या. केंद्र शासनामार्फत 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दि.19 ते 25 डिसेंबर २०२२ या कालावधीत “सुशासन सप्ताह-प्रशासन गाव की ओर” साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज उपजिल्हाधिकारी  ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपआयुक्त अर्चना दिवे, नवी मुंबई महानगरपालिकाचे उप आयुक्त नितीन नार्वेकर, ठाणे महानगरपालिका उप आयुक्त मारूती खोडके, शहापूर प्रकल्प अधिकारी डी. के. म्हस्के, ठाणे महावितरण मंडळाच्या उप कार्यकारी अभियंता सोनाली फडणीस आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कालावधीत निकाली काढलेले तक्रार अर्ज, आपले सरकार पोर्टलवर निकाली काढलेली प्रकरणे,सेवा हमी अंतर्गत समाविष्ट सेवांची संख्या,सेवा हमी अंतर्गत सेवा पुरविताना निकाली काढलेल्या अर्जाची संख्या,सुशासनामध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबाबत लेख व त्याबाबतची चित्रफित, फोटो या पोर्टलवर अपलोड करावेत. तक्रारींचे निवारण करीत असताना आलेले अनुभव व अडचणी आणि तक्रार निवारण झाल्याची प्रत्येक जिल्ह्यातील यशोगाथा संबंधित कार्यालयांनी/विभागांनी यशोगाथेचे लेख पोर्टलवर अपलोड करावे, अशा सुचना श्री. ठोंबरे यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading