खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखांचं विमा कवच देण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची संसदेत मागणी

कोरोना काळात सेवा देणा-या खाजगी डॉक्टरांनाही ५० लाख रूपयांचं विमा कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे त्याच धर्तीवर केंद्र सरकारनंही हा निर्णय घेऊन खाजगी डॉक्टरांना ५० लाख रूपयांच्या विम्याचं कवच द्यावे अशी मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केली आहे. संसदीय अधिवेशनात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे ही मागणी केली आहे. सर्वात जास्त परप्रांतिय मजूर असणा-या कल्याण लोकसभा मतदारसंघाचं आपण प्रतिनिधीत्व करत असून सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोरोना विरूध्द लढाई लढली पाहिजे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. कोरोनाचा सामना करण्यासाठी जम्बो कोविड सेंटर, अँटीजेन चाचण्या, आरटीई-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. सरकारी रूग्णालयात सेवा देणा-या डॉक्टरांना ५० लाख रूपयांचं सुरक्षा विमा कवच देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारनं अन्य राज्यातील खाजगी आणि सरकारी रूग्णालयात कोविड सेवा देणा-या डॉक्टरांना ५० लाख रूपये कोविड सुरक्षा विमा कवच म्हणून देण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading