कोवि़ड सदृश्य अत्यवस्थ रूग्णांना कोविड रूग्णालयात तातडीनं भरती करण्याची महापौरांची सूचना

तीव्र स्वरूपाच्या कोविड रूग्णास कोविड रूग्णालयातील अतिदक्षता विभागात तातडीनं भरती करून नंतर त्याची तपासणी करावी आणि रूग्ण निगेटिव्ह आढळल्यास त्यांना नॉन कोविड रूग्णालयात हलवावे अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना केली आहे. राज्य शासनानं मार्च २०२० मध्ये कोविड रूग्णालयामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रूग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करून त्यांना वेगवेगळे प्रवेश ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या आजारांपैकी तीव्र स्वरूपाचे रूग्ण कोविड रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करून नंतर त्यांची तपासणी करावी आणि निगेटिव्ह आढळल्यास त्यांना नॉन कोविड रूग्णालयात हलवावे अशाही सूचना दिल्या होत्या. केंद्रानंही अशाच त-हेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जी मोठी कोविड रूग्णालयं आहेत त्या ठिकाणी खाजगी तसंच शासकीय दोन्ही प्रकारच्या रूग्णालयामध्ये एक कक्ष स्वतंत्र प्रवेशासह निगेटिव्ह रूग्णांसाठी असावा तसंच अत्यवस्थ कोविड सदृश्य रूग्णांना तातडीनं भरती करून शासन निर्णयानुसार उपचार करण्याची कार्यवाही करावी असे आदेश सर्व संबंधितांना द्यावेत अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading