ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी कोपरी, माजिवडा आणि कोलशेत येथील मलप्रक्रिया केंद्राची पाहणी करून उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. ठाणे महापालिकेचे कोपरी येथे १२० दशलक्ष लिटर क्षमतेचं, माजिवडा येथे २२ तर कोलशेत येथे २३ दशलक्ष लिटर क्षमतेचं मलप्रक्रिया केंद्र आहे. या तिन्ही केंद्रांची अहिवर यांनी पाहणी केली. माजिवडा आणि कोलशेत मलप्रक्रिया केंद्रासह खारेगांव आणि विटावा मलप्रक्रिया केंद्राची विद्युत आणि यांत्रिकी कामं २० फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.