मुल्लाबाग टीएमटी बस डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपो नामकरण

मुल्लाबाग टीएमटी बस डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपो असं नामकरण करण्यात आलं आहे. मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश आंब्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मुल्लाबाग आगारात जाऊन या आगाराचं छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपो असं नामकरण केलं. गेल्या दोन वर्षापासून असं नामकरण करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता मात्र सत्ताधा-यांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. एखाद्या नगरसेवकाच्या निधन झालेल्या नातेवाईकांचं नाव लगेच रस्ता किंवा चौकाला लागते. काही दिवसांपूर्वी आमदारांच्या वडीलांचे नाव उपवन डेपोला देण्यात आलं. तर माजी महापौरांच्या वडीलांचे नाव तुळशीधाम बगिच्याला देण्यात आलं. मात्र राष्ट्रपुरूषांचं नाव लावण्यास विलंब होतो. या मनोवृत्तीचा त्यांनी निषेध केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading