ठाण्यातील ज्येष्ठ रंगभूमी तंत्रज्ञ प्रभाकर साठे यांचं दीर्घ आजाराने निधन

ठाण्यातील एक ज्येष्ठ रंगभूमी तंत्रज्ञ प्रभाकर साठे यांचं काल दीर्घ आजाराने निधन झाले. काही काळ ते दहीसर येथे त्यांच्या मुलीकडे राहत होते. नाटकांना ध्वनीमुद्रित पार्श्वसंगीत देण्यासाठी ते प्रसिध्द होते. ७० ते ९० च्या कालखंडात स्पर्धेच्या नाटकांसाठी पार्श्वसंगीत करताना ते हौशी नाट्यसंस्थांना कुठल्याही अपेक्षेविना मदत करत असत. मंतरलेली चैत्रवेल सारख्या काही व्यावसायिक नाटकांनाही त्यांनी ध्वनीमुद्रित पार्श्वसंगीत दिलं होतं. जुन्या रविंद्र नाट्यगृहातल्या रेकॉर्डींग स्टुडीओचं काम ते बघत असत. तिथेच त्यांना रेकॉर्डींग जतन करण्याचा छंद जडला. शासनाचे सगळे महोत्सव तसंच रविंद्र नाट्य मंदिरात त्या काळात झालेले महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी ध्वनीमुद्रित केले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading