ठाण्याचे महापौर भ्रष्टाचारी असल्याची टिप्पणी समाज माध्यमांवर करणा-याच्या विरोधात पोलीसांकडे तक्रार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला असतानाही समाजातील काही अपप्रवृत्तीकडून प्रशासनाच्या उपाययोजनांवर टिका टिप्पणी केल्याचे प्रकार सोशल मिडीयातुन वाढीस लागले आहेत. कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी ठाणे महापालिकेकडुन केल्या जात असलेल्या तपासणीसाठी 5 हजार रुपये उकळले जात असल्याची दिशाभूल करणारी माहिती फेसबुकवर प्रसारीत करून योगेश गावडे नामक व्यक्तीने, हा म्हणजे ठाण्याच्या महापौरांचा भ्रष्टाचार असल्याची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी देशपांडे यांनी या व्यक्तीविरोधात नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी संबधीत व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने आपण लॉक डाऊनमुळे पुण्यात अडकलो असुन स्वॅब तपासणीबाबतची वस्तुस्थिती मांडल्याची कबुली दिली.अशी माहिती नौपाडा पोलीसांकडुन देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासन या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत आहे.पालिकेच्या तसेच शासकिय रुग्णालयात कोरोना संशयितांची मोफत तपासणी केली जात आहे. तरीही योगेश गावडे नामक व्यक्तीने आपल्या फेसबुकवर ठाणे महापालीकेमार्फत स्वॅब तपासणीसाठी 5 हजार रुपये उकळले जात आहेत.अशी दिशाभूल करणारी खोटी माहिती पसरवुन जनमानसात अफवा पसरवली.त्याचबरोबर, महापौरांना उद्देशुन दलाल, चोर संबोधत जनतेला वेठीला धरून यातही ‘हे’ दलाली खाऊन बेहिशोबी मालमत्ता जमवतील अशी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.याची दखल घेत महापालिकेच्या वाडीया रुग्णालयाच्या वैदयकिय अधिकारी अश्विनी देशपांडे यांनी थेट नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading