काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाणांकडून महिला पत्रकाराला मारहाण

काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी एका महिला पत्रकाराला मारहाण केल्यामुळं पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय झाले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधी तबस्सुम बरनागरवाला यांना ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातं. विक्रांत चव्हाण हे मेट्रोचे दोन कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांवर ओरडत होते. त्यामुळं तबस्सुम चौकस झाल्या आणि त्यांनी चव्हाण यांना त्यांचं नाव विचारलं. त्यावरून चव्हाण यांनी ही मारहाण केल्याचा आरोप तबस्सुम बरनागरवाला यांनी केला आहे. दरम्यान ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं या मारहाणीचा निषेध केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading