शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी व्यंगचित्र पाठवण्याचं आवाहन ठाणे पूर्वतील शिवसेवा मित्रमंडळानं केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारीला असून व्यंगचित्रकला या लोकप्रिय कलेचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशानं या व्यंगचित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेचं हे सहावं वर्ष असून १० वर्षावरील व्यंगचित्रकारास समाज प्रबोधन या विषयावरील व्यंगचित्र पाठवता येईल. व्यंगचित्रकारांनी आपली व्यंगचित्र २० जानेवारीपर्यंत ठाणे पूर्वच्या शिवसेना शाखेत पोहचवायची आहेत. निवडलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन २३ जानेवारीला ठाणे महापालिकेच्या खुल्या कला दालनात आयोजित करण्यात आलं आहे.