कळवा रूग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचं लोकार्पण

ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयामध्ये आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र सुरू करण्यात आलं असून पालकमंत्र्यांच्या हस्ते आज या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं.छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयामध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून काही दिवसात या रूग्णालयाचा कायापालट करण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली. प्लॅटीनम हॉस्पिटल आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं गोरगरिब ठाणेकरांना अतिशय अल्प दरामध्ये हृदयरोगासंबंधीच्या सर्व सुविधा विनामूल्य दिल्या जाणार आहेत. यामध्ये टूडी इको पासून एन्जियोग्राफी, एन्जियोप्लास्टी, स्टेंट टाकणे याशिवाय बायपास शस्त्रक्रियेसह अनुषंगिक उपचार विनामूल्य दिले जाणार आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधीन असणा-या नागरिकांना हे मोफत उपचार मिळणार आहेत. तर अन्य नागरिकांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. या उपचार केंद्रामध्ये १०० खाटांची योजना असून त्यापैकी ७० खाटा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading