कल्याण लोकसभा मतदारसंघात अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर

अखेर ब-याच चर्चेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये युवा सेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत खासदार श्रीकांत शिंदे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील अशा विश्वास युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. खासदार शिंदे यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून मित्र पक्षातील सर्वच नेते हे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. युवासैनिक ऋषिकेश माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 जागा महायुतीच्या निवडून येतील यासाठी युवा सैनिक देखील प्रयत्न करतील अशी प्रतिक्रिया यावेळी ऋषिकेश माने यांनी दिली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading