कल्याण-मलंगगड रस्त्याचे लवकरच कॉंक्रिटकरण

अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या मलंगगडापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांचा रस्त्यांवरचा प्रवास आता सुखकर होणार आहे. कल्याण-मलंगगड रस्त्याचे लवकरच कॉंक्रिटकरण केले जाणार आहे. या रस्त्यांसाठी सुमारे साडेबारा कोटींच्या कामाचे नुकतेच कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या उभारणीला लवकरच सुरूवात होणार आहे. तर कल्याण ते मलंगगड या रस्त्याच्या कामांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. या कामांसाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा सुधारून त्यांचे मजबुतीकरण करण्याचे काम श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, दिवा, मुंब्रा, उल्हासनगर या शहरांतील रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांसाठीही भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात शिंदे यांना यश आले आहे. याचाच भाग म्हणून मलंग गडाकडे जाणाऱ्या भक्तांसाठी आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. अखेर मलंग गडाकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कल्याण मलंगगड रस्ता ते हाजीमलंग वाडीच्या फनिक्युलर लोअर ट्रॉली स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाठी 9 कोटी आणि कल्याण मलंगगड रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी साडेतीन कोटीच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाला सुरूवात होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading