​१८ वर्षाखालील दुहेरी राष्ट्रीय लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नील पिल्ले हा ठाणेकर दुहेरीमध्ये उपविजेता

१८ वर्षाखालील दुहेरी राष्ट्रीय लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नील पिल्ले हा ठाणेकर दुहेरीमध्ये उपविजेता ठरला आहे.  हरियानाच्या जॉयगॉन टेनिस अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॉन टेनिस स्पर्धेत देशभरातून १८ वर्षाखालील टेनिस पटू सहभागी झाले होते. १८ वर्षाखालील दुहेरी उपविजेत्या सामन्यात नीलचा सहकारी दिल्लीचा अभय छाब्रा होता. तर त्यांचा सामना आर्यन अरोरा आणि नव्या वर्मा यांच्यात झाला. यामध्ये अरोरा-वर्मानं पिल्ले-छाब्रांवर विजय मिळवला. अतिशय रोमहर्षक सामना झाला. पहिल्या डावात पिल्ले-छाब्रानं विजय मिळवला तर दुस-या डावात अरोरा-वर्मानं विजय मिळवला. त्यामुळं टाय ब्रेकर सामना खेळवण्यात आला. यामध्ये १० विरूध्द ७ नं पिल्ले-छाब्राचा अगदी थोड्या फरकानं पराभव झाला. सध्या नील पिल्ले हा हरियानामध्ये ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading