कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पूर्व परिसरातील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पूर्व परिसरातील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या कामांना रविवारी प्रत्यक्ष सुरूवात झाली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयत्नांतून  कल्याण- डोंबिवली शहरातील रस्ते कामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व परिसरातील ११० कोटी ६० लाख रुपये खर्चातून होणाऱ्या ११ विविध रस्त्यांच्या कामांना रविवारी सुरूवात झाली. खोणी ते काटई नाका या मार्गिकेच्या कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची रस्त्यांवरील खड्ड्यांपासून मुक्तता व्हावी आणि रस्त्यांचे नूतनीकरण तसेच काँक्रीटीकरण व्हावे यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरवठा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण- डोंबिवली शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले होते. सद्यस्थितीला या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून  कल्याण लोकसभा मतदारसंघातील  कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पूर्व परिसरातील विविध प्रभागांतील ११०. ६० कोटी रुपयांच्या ११ प्रमुख रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये उंबार्ली पाईपलाईन ते उंबार्ली स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता नूतनीकरणमानपाडा शिवमंदिर ते संदप उसरघर स्त्याचे काँक्रीटीकरणक्रिस्टल प्लाझा ते गोदावरी बिल्डिंग रस्ता (कल्याण ईस्ट लोकग्राम)१०० फुटी रस्ता ते तिसाई मंदिर रास्ता विजयनगर नाका ते आमराई (धर्मवीर आनंद फिघे साहेब चौक)नूतन विद्यामंदिर शाळा ते नाना पावशे चौकशिवाजी कॉलोनी ते जुनी जनता बँककल्याण पूर्व चिंचपाडा कमान ते डी. एम.एम. शाळेपर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरणकाटेमनावली नाका – हनुमान नगर – हरिभाऊ पाडा – साईबाबा नगर – कैलास नगर – म्हसोबा चौक – खडेगोलवली पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणविठ्ठलवाडी स्टेशन ते सूर्या शाळेपर्यंत च्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जगदीश दूध डेअरीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण अशा ११ रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन यावेळी पार पडले. लवकरच या रस्त्यांचे काम पूर्ण होऊन हे रस्ते नागरिकांच्या सेवेत येतील अशी माहिती यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होईलअसेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. याप्रसंगी महत्वांकाक्षी खाणी ते काटई नाका या मार्गिकेच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून या मार्गासाठी २० कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. यातील एक मार्गिका यापूर्वीच प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. अंबरनाथ येथील शिवगंगानगर प्रभागातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक रवींद्र चाहू पाटील यांच्या प्रयत्नांनी अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शिवगंगानगर येथे सुरू करण्यात आलेल्या योगा केंद्राचे‘ लोकार्पण रविवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच वडवली विभागातील रायगड इमारतीसमोरील चौकात माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून वारकरी संप्रदाय आणि शिवभक्तांना अपेक्षित असणारे आणि आदर्शव्रत वाटणारे भक्ती – शक्ती शिल्पचित्र उभारण्यात आले होते. त्याचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading