आम आदमी पक्षातर्फे शहरातील टोईंग विरोधात आंदोलन

आम आदमी पक्षातर्फे शहरातील टोईंग विरोधात आंदोलन करण्यात आलं. ठाण्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून पुन्हा टोईंग सुरू झालं आहे. विना परवाना पार्कींग करणा-या दुचाकी गाड्या या टोईंग करून नेल्या जातात. यामुळं दुचाकी धारकांची मोठी गैरसोय होते. या विरोधात आम आदमी पक्षातर्फे तीन हात नाका येथे हे आंदोलन करण्यात आलं. टोईंग हा अत्याचार आरटीओ करतोय भ्रष्टाचार, पार्कींग सुविधा आधी करा तोवर टोईंग बंद करा, टोईंग माफीया बंद करा बंद करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. टोईंगची कारवाई बंद असताना वाहतुकीला कोणतीही अडचण झाली नाही मग लोकांची गैरसोय का, असा प्रश्न यावेळी आम आदमी पक्षातर्फे उपस्थित करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading