कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा युवा नेतृत्व पुरस्काराने गौरव

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना युवा नेतृत्व पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने राज्यभरात सुरु असलेली लोकसेवेची कामे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन खासदार  शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. झी एंटरटेमेंटचे चीफ क्लस्टर ऑफिसर वेस्ट नॉर्थ अँड प्रीमियम अमित शाह यांच्या हस्ते खासदार शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण,आरोग्य, राजकीय, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये  कार्य कर्तृत्वाने समाजात आपल्या कामाची मोहोर उमटवणाऱ्या आणि कधीही प्रकाशझोतात न येणाऱ्या नागरिकांना झी समुहा तर्फे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. याच पद्धतीने झी समूहातर्फे विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून जनसेवा करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी झी युवा सन्मान २०२३ या भव्य सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना युवा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गरजू रुग्णांना योग्य पद्धतीचे उपचार मिळवून देण्यासाठी सर्व स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत असतात. यामुळे या पुरस्काराचे खरे मानकरी ते आहेत, अश्या भावना खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading