जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यासह विक्रीवर देखील बंदी

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यासह अशा पदार्थ विक्रीवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. तरीही छुप्यारितीने काळ्या बाजारात सिगरेटस विक्री करणाऱ्या तस्कराला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. सुनिलकुमार गुप्ता असे त्याचे नाव असुन किंगकाँगनगरमधील चाळीतुन त्याच्याकडून सव्वा लाखांच्या सिगरेटसचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील घोडबंदर पट्ट्यात छुप्या रितीने तंबाखु जन्य पदार्थ, सिगारेटसची विक्री सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाल्यानंतर, किंगकाँगनगरमधील गुप्ता चाळीत छापा मारून पोलीसांनी 1 लाख 28 हजार रूपयांची सिगरेटसची 1500 हून अधिक पाकिटे जप्त केली. हा साठा सुनिलकुमार या तस्कराने चाळीतील परिचिताच्या घरात लपवुन ठेवला होता. त्याच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading