एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज पुन्हा ठाण्यात शक्ती प्रदर्शन

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज पुन्हा ठाण्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याच्या घोषणा दिल्या. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सांगत लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असं सांगितलं. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर आज ठाण्यातील शिंदे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. संजय राऊत यांनी भान ठेवून बोलावे असं सांगत श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला. यावेळी शेकडो शिवसैनिक आनंदाश्रम येथे जमा झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading