राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अवघ्या एकाच दिवसात 957 जणांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी 234 जणांना ऑन दि स्पॉट दाखले देण्यात आले असून उर्वरित 723 जणांना दोन दिवसात दाखले प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वागळे इस्टेटमधील सेंट लॉरेन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रहिवास दाखला, अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखले यांचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. यावेळी विविध चाचण्या करुन तहसीलदार कार्यालयाच्या वतीने जागेवरच सुमारे 234 जणांना दाखले देण्यात आले. तर, वेळेअभावी ज्या 723 जणांचे दाखले झाले नाहीत, त्यांना येत्या दोन दिवसात दाखले प्रदान करण्यात येणार आहेत. शालेय वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना विविध दाखल्यांची गरज बासत असते. हे दाखले काढण्यासाठी पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो. हा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी राष्ट्रवादी काँगरेस दरवर्षी दाखले वाटपाचा कार्यक्रम राबवित असते. त्याचाच भाग म्हणून येथे दाखले वाटप करण्यात येत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading