आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशन मार्फत कोकणासाठी मदत

आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशन मार्फत कोकणात पूरग्रस्त लोकांना मदत पाठविण्यात आली. महाड, खेड, चिपळूण आदी भागात पावसाने, नदीच्या पुराने थैमान घातले तर दरड कोसळून अनेक कुटुंबच्या कुटुंबे त्या दरडीखाली आली. अनेकांचे संसार उद्वस्त झाले आहेत.महाराष्ट्रातुन अनेकांचे मदतीचे हात कोकणासाठी येत आहेत. जो तो आपापल्या परीने कोकणातील लोकांसाठी मदत करत आहे. संजय फाउंडेशन मार्फत कोकणातील शेकडो कुटुंबासाठी सोलरचे दिवे, धान्य, जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्याची माहिती संजय केळकर यांनी देऊन ठाणेकरांनी कोकणातील लोकांसाठी केलेली ही भरीव मदत असल्याचं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading