ठाणे वाहतुक पोलीस आणि राधे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ”गीव्ह वे टू अँम्ब्युलन्स” अभियान

ठाणे वाहतुक पोलीस आणि राधे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ”गीव्ह वे टू अँम्ब्युलन्स” या अभियानाची सुरूवात करण्यात आली. कोरोनामुळे अँम्ब्युलन्सचा वापर अधिक प्रमाणात होत असुन आरोग्य आणीबाणीच्या कालावधीत अशी वाहने जिवनदुताचे काम करीत आहेत. ठाणे शहर वाहतुक पोलीस आणि राधे फाउंडेशच्या संयुक्त विद्यमाने ”गीव्ह वे टू अँम्ब्युलन्स” या अभियानास आज प्रारंभ करण्यात आला. वाहतूक शाखेच्या कार्यालयात या हद्दीतील अँम्ब्युलन्स मालकांची बैठक घेवुन त्यांच्या समस्या समजुन घेवुन सर्वाना ”गीव्ह वे टू अँम्ब्युलन्स” या अभियानात सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच भविष्यात अँम्ब्युलन्स चालक प्रशिक्षण आयोजित करणेबाबत सुतोवाच करण्यात आले. यावेळी राधे फौंडेशनच्या डॉ. रीटा सावला उपस्थित होत्या. वाहतुकीच्या वेळी अशा अँम्ब्युलन्सना वेगवान आणि सुकर प्रवासाकरीता नागरीकांनी प्राधान्य दयावे असे आवाहन वाहतुक शाखेमार्फत करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading