आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं असं वैयक्तीक मत व्यक्त करणारा सल्ला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी ९ तारखेला असा सल्ला देणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून आज ते बाहेर आलं आहे. एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत असतानाच दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीत शिवसैनिक नेते- कार्यकर्त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं असं मत व्यक्त करणारं पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण केल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं असतानाच भारतीय जनता पक्षाची युती ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं करण्यासाठी झाली का असा प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आपल्याच कार्यकर्त्यांना ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाशी युती करावी असं वैयक्तीक मत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी व्यक्त केलं आहे. सध्या आपल्यासह रविंद्र वायकर, अनिल परब अशा अनेक नेत्यांच्या मागे ससेमिरा लागला असून एका प्रकरणातून सुटल्यावर दुस-या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी या पत्रात केला आहे. भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतल्यास आगामी महापालिका निवडणुकांमध्येही त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपल्या कार्यकर्त्यांना होणा-या त्रासातूनही मुक्तता मिळू शकते असं सांगत हे आपलं वैयक्तीक मत असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मात्र प्रताप सरनाईक यांच्या या लेटरबॉम्बमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एकंदरीतच सर्वकाही आलबेल दाखवलं जात असलं तरी सर्वकाही आलबेल नसल्याचंच या पत्राच्या मुळे स्पष्ट होत आहे. शिवसेना आमदारांची कामं होत नाहीत पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आमदारांची कामं अनेकदा पटकन होतात असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मात्र बरीच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading