कित्येक शिवसैनिक कोविडमध्ये गेले पण तेव्हा उध्दव ठाकरे आले नाहीत आता खोट्या माहितीवरून आले अशी जोरदार टीका करत आमचा संयम सोडू देऊ नका असं नरेश म्हस्के यांनी सुनावलं. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार जुंपली आहे. यावरून नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन रोशनी शिंदे यांची विचारपूस केल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरून आज नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे नेते महिलेच्या पडद्या आड लपून आमच्यासमोर येत आहे.
लोकांची सहानुभूती घेत आहेत. खासदार राजन विचारे यांनी कट रचला आणि बनाव केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला.
रोशनी शिंदे यांना पुढे करून अत्यंत वाईट पोस्ट टाकली आहे. प्रेग्नेंट महिलेला मारहाण म्हणून खोटी माहिती विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचंही नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितलं.