शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथी धीर गंभीर वातावरणात संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पुण्यतिथीच्या निमित्ताने आनंद आश्रम आणि शक्ती स्थळावर आले होते. एकनाथ शिंदे यांनी शक्ती स्थळ आणि आनंद आश्रम येथे येऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर शक्ति स्थळावर जाऊन त्यांनी दिघे यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केली. यावेळी शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकारीही या ठिकाणी उपस्थित होते. ठाण्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनीही आनंद दिघे यांना अभिवादन केलं. खासदार राजन विचारे यांनीही शक्ती स्थळावर जाऊन दिघे यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केलं. दिघे यांना अभिवादन करण्यासाठी शक्ती स्थळावर अलोट गर्दी झाली होती. मुख्यमंत्री ठाण्यात आल्यामुळे आज ठाण्याच्या काही भागात मोठ्या वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता. याव…