आनंद दिघे यांची ६८वी जयंती धीरगंभीर वातावरणात साजरी

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची ६८वी जयंती आज धीरगंभीर वातावरणात साजरी करण्यात आली. ठाण्यातील शक्तीस्थळावर आनंद दिघे यांच्या चाहत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह सर्वसामान्य कार्यकर्ते, शिवसैनिक तसंच नागरिकांनीही शक्तीस्थळावर फुलं वाहून आदरांजली अर्पण केली. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading