लग्नात आहेर न स्वीकारता ध्वजदिन निधीसाठी आहेर दिल्यानं एकाच दिवसात ७ लाखांचा निधी

ठाणे जिल्हा सैनिक निधीस एका दिवसात एका विवाहितेनं लग्नानिमित्त आलेल्या भेटी न स्वीकारता या सर्व भेटी ध्वजदिन सैनिक निधीस दिल्यामुळे एका दिवसात ७ लाख रूपये गोळा झाले आहेत. जिल्हा सैनिक मंडळाचे धीरज धरोड यांची मुलगी डॉ. उष्मा हिचे लग्न झाले. या लग्नात मुलीनं येणा-या पाहुण्यांना भेट किंवा पुष्पगुच्छ न देता जिल्हा सैनिक ध्वजदिन निधीसाठी योगदान देण्याचं आवाहन केलं होतं. आपले वडील हेच आपले आदर्श आहेत आणि त्यांचं ब्रीदवाक्य हे देश हा नेहमी पहिला आणि मग नंतर सर्व. आपल्या वडीलांनी देशासाठी सेवा केली. त्यामुळं आपल्या लग्नाचा आहेर म्हणून आपल्याला कोणतीही भेट, वस्तू, पैसे अथवा पुष्पगुच्छ असं काही नको तर हे सर्व ध्वजदिन निधीस द्यावे असं आवाहन तिने केलं होतं. त्यानुसार तिच्या आवाहनास लोकांनीही मोठा प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही लग्नाला उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्यामुळं या लग्नात ७ लाख रूपयांचा आहेर जमा झाला. हा सर्व आहेर धरोड यांच्या कन्येनं जिल्हा सैनिक निधीस दिला. त्यामुळं जिल्हा सैनिक निधीस एका दिवसात ७ लाख रूपयांचा निधी मिळाला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्रतर्फे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आलं. २०१८ च्या ध्वजदिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हे स्मृतीचिन्ह देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading