आंदोलन करणाऱ्यांवर दमदाटी करणा-यांवर कारवाई झाली नाही तर आमदारकीचा राजीनामा देईन – आमदार प्रताप सरनाईक

आंदोलन करणाऱ्यांवर दमदाटी करणा-यांवर कारवाई झाली नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
बंद पडलेल्या कंपनीमध्ये कामगारांना मुंबईच्या धर्तीवर घरे मिळावीत या मागणीसाठी वर्तकनगर येथील इंडिया स्मेलटिंग ( बिर्ला ) कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांवर बिल्डरच्या माणसाने बंदुकाचा धाक दाखवल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या धनजय सिंग याला अटक करा या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन केले. या प्रकरणानंतर आमदार प्रताप सरनाईक आक्रमक झाले असून या संदर्भात गुन्हा दाखल करावा अन्यथा आमदारकीचा राजीनामा देईन असे सांगितले आहे. आपल्या कार्यकर्त्यांवर असा प्रकार कोण करत असेल तर आपण सहन करणार नाही कार्यकर्त्यांपेक्षा आपल्यासाठी आमदारकी मोठी नाही असेही त्यांनी खडसावले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading