असे होते आमचे दिघे साहेब” – खासदार राजन विचारे यांनी विभागीय मेळाव्याला शिवसैनिकांना सांगितली एकनिष्ठतेची व्याख्या

तुरुंगवास वाढला तरी चालेल परंतु पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. या विधानावर आनंद दिघे यांनी ठाम राहून शिवसेनेशी असलेली एकनिष्ठतेची व्याख्या दाखवून दिली असा एक किस्सा खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांना सांगितला. वर्तक नगर, सावरकर नगर, लोकमान्य नगर, रामचंद्र नगर, रघुनाथ नगर, जिजामाता नगर, ज्ञानेश्वर नगर, जीवन नगर हाजुरी, परिसरातील शिवसैनिकांचा विभागीय मेळावा वर्तकनगर येथे झाला. खासदार राजन विचारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना एकनिष्ठतेची व्याख्या सांगत असताना ‘दिघे’ साहेबांच्या आठवणीतील हा किस्सा सांगितला. असे होते आमचे दिघेसाहेब हे सांगताना त्यांनी ‘दिघे’ साहेबांना ज्यावेळी टाडा लावण्यात आला त्यावेळी दिघे साहेबांनी “गद्दारांना क्षमा नाही” असे विधान केले होते. दिघे साहेबांना तुरुंगात असताना राजन विचारे हे नेहमी भेटण्यास जात होते. काँग्रेसचे नेते प्रभाकर हेगडे यांनी राजन विचारे यांच्याकडे ‘दिघे’ साहेबांसाठी चिठ्ठी लिहून पाठविली होती. त्या चिठ्ठीत गद्दारांना क्षमा नाही ‘हे मी बोललो नाही असे स्टेटमेंट करण्यास सुचविले होते. परंतु दिघे साहेबांनी मी जे बोललो ते बोललो पण माघार घेणार नाही. असे बोलून चिठ्ठी फाडली. त्यांनी असेही सांगितले कि, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. परंतु दिघे साहेब सरकारच्या दडपशाहीला न जुमानता त्यांना शरण गेले नाहीत असा टोला विचारे यांनी यावेळी मिंधे गटाला मारला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading