उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले. तसेच मॉडेल मिल कंपाऊंड येथील रास रंग ठाणे 2022 कार्यक्रमासही हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री ठाण्यातील मानाच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली.
यानंतर फडणवीस यांनी टीपटॉप प्लाझा येथील ठाणे रास रंग 2022 या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन गरबा खेळणाऱ्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तुमचा जोश पाहून खूप आनंद झाला. दोन वर्षानंतर गरबा रास खेळण्याचा तसेच आनंद व्यक्त करण्याची संधी माता राणीच्या कृपेने मिळाली आहे. माता राणीकडे एवढेच मागणे आहे की, सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान, ऐश्वर्य येऊ दे. सर्वांचे दुःख दूर होऊ दे अशा शुभेच्छा देत ढोलकी वाजविणाऱ्याचे विशेष कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading