अमर टॉवर या इमारतीचे लवकरात लवकर पुनर्वसन करू – नरेश म्हस्के

अमर टॉवर या इमारतीचे लवकरात लवकर पुनर्वसन करू असं आश्वासन शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी दिलं आहे. दोन दिवसापूर्वी अमर टॉवर मधील दुसऱ्या माळ्यावरील स्लॅब पहिल्या माळ्यावर येऊन कोसळला होता. यामध्ये तीन जण जखमी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी तातडीने तीन लाख रुपयांची मदत म्हस्के यांच्यामार्फत त्यांच्या घरच्यांना सुपुर्द केली. यावेळी बोलताना म्हस्के यांनी ठाणे शहरातील जुने ठाणे म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात अनेक वर्ष जुन्या इमारती असून येथील इमारतींचे लवकरात लवकर पुनर्वसन करु असे आश्वासन दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading