एका मुलीसोबत साखरपुडा करुन, दुसरीसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात

डोंबिवलीत एका मुलीसोबत साखरपुडा करुन दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धार्थ शिंदे असे या आरोपीचे नाव असून 4 वर्षा पूर्वी पीडित मुलीला एका लग्ना दरम्यान भेटत तिच्या आईवडिलांना लग्न करत असल्याचे भासवत मुलीशी साखरपुडा केला आणि तिच्याशी शारिरीक संबंध ठेऊन तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. याची माहिती पीडित तरुणीला मिळताच पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठत सिद्धार्थ आणि त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दुसरी सोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची थेट पोलीस ठाण्यात वरात काढत सिद्धार्थला साथ देणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा शोध सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading